ई-विकास विषयी
ई-विकास विषयी
सूचना
शैक्षणिक वर्ष २०१२-१३ साठीचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती चे अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०१३ आहे.
Note:Website is under technical maintenance from 25th march 2019 to 30th march 2019
सर्व विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयंना सूचित करण्यात येते की, सन २०१४-१५ ,२०१५-१६ आणि २०१६-१७ मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे बाकी होते अशा विद्यार्थ्यांनसाठी शासना मार्फत दिनांक ३०.४.२०१८ पर्यंत मुदत वाढ देण्यात अली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांचे किंवा महाविद्यालयांनचे अर्ज प्रलंबित असतील अशा विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी दिनांक ३०. ४. २०१८ पर्यंत आपले अर्ज प्रणाली वर अद्यावत करून घ्यावेत, या तारखे नंतर कोणत्याहि प्रकारची मुदत वाढ दिली जाणार नाही.
सर्व माहाविद्यालयांना या आवाहनाव्दारे सूचित करण्यात येत की, आदिवासी विकास विभागाच्या etribal.maharashtra.gov.in पोर्टलवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेचे 2017-18 शैक्षणिक वर्षाकरीता नवीन व नुतनीकरणाचे ऑनलाईन प्रस्ताव महाविद्यालयांकडून संबधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना त्वरीत सादर करणे आवश्यक होते, तथापी अद्यापही राज्यातील महाविद्यालयस्तरावर मोठया प्रमाणावर अर्ज प्रलंबीत असून,त्यावर महाविद्यालयाकडून मंजुरीची प्रक्रीया झाली नसल्याचे निर्दशानास आले आहे . याअनुषंगाने महाविद्यालयाकडून ऑनलाईन (etribal.maharashtra.gov.in पोर्टलवर ) पध्दतीने संबधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्याची अंतीम मुदत दिनांक 23.03.2018 पर्यंत देण्यात येत आहे.
आधार कार्ड , आयडी पासवर्ड पुनर्प्राप्त आणि वार्षिक उत्पन्न संबंधित सुधारणासाठी खालील संकेतस्थळावर क्लिक करा. https://goo.gl/forms/RBAfScNfV40BmNK62सन २०१७-१८ साठी आधार नंबर अर्जा मध्ये नमूद करणे अनिवार्य आहे नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही .
आधार क्रमांक अपडेट होत नसल्यास तात्काळ सपोर्ट ई-मेल वर मेल करावा.सपोर्ट ई-मेल वर मेल करताना आधार कार्डची स्पष्ट स्कॅन प्रत जोडणे अनिवार्य आहे. आधार कार्ड जोडले नसल्यास तक्रारीचे निराकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाविद्यालयाने विध्यार्थ्यांच्या आधार कार्ड ची मूळ प्रत तपासून नंतरच अर्जाची पडताळणी करावी,आधार क्रमांक चुकीचा असल्यास सर्वस्व जवाबदारी हि संबंधित महाविद्यालयाची असेल.
महाविद्यालयाने आधार क्रमांक नसलेले अर्ज स्वीकारू नयेतसण २०१७-१८ पासून वसतिगृह प्रवेशासाठी व स्वयं योजने साठी विध्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. प्री-मॅट्रिक साठी २०१६-१७ ह्या वर्ष्यासाठी अर्ज नूतनीकरणाचे(ऑटो रिन्यूअल) काम चालू आहे . अर्ज नूतनीकरणाचे काम बहुतांश शाळेंसाठी पूर्ण झालेले आहे.अर्ज नूतनीकरण झालेले अर्ज हे मुख्याध्यापक लॉगिन ला दिसतील मुख्याध्याकांनी ह्या यादीची पडताळणी करून हे अर्ज BEO ला पुढील प्रक्रियेसाठी पाठवावेत .शाळेने नवीन विद्यार्थ्यांची यादी प्रणालीवर अद्यावत करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे सन २०१५-१६या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन भरावयाचे शिल्लक राहिलेले अर्ज व
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षसाठी नवीन व जुने अर्जाचे नूतनीकरण दि. ५ एप्रिल २०१७ नंतर ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील .सदर दिनांक पूर्व अर्ज ऑनलाईन सादर करता येणार नाही , त्यामुळे कृपया या दिनांक पूर्वी अर्ज ऑनलाईन सादर करण्याचा प्रयत्न करू नये.ऑनलाईन अर्ज भरणेसाठी किंवा प्रणालीशी संबंधित कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी कृपया etribal.support@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर सविस्तर माहितीसहीत ईमेल करावा.User ID व Pass word विसरल्यास आपल्या महाविद्याल्याशी संबंधित असलेल्या प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, कार्यालयाचे दुरध्वनी संपर्क क्रमांची यादी Home Page वर उपलब्ध आहे. नविन शाळा किंवा महाविद्यालय प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शाळा / महाविद्यालयाने त्यांचेशी संबंधित प्रकल्प कार्यालयाशी दिनांक 15 मार्च 2017 पुर्वी तात्काळ संपर्क साधावा.
आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या महाविद्यालयांचे ई–शिष्यवृत्ती अंतर्गत मॅपिंग झालेले आहे, परंतु काही कोर्स मॅपिंग न झाल्याने विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना दिसत नाही.अशा महाविद्यालयाने संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क साधून मॅपिंग न झालेल्या कोर्सबाबतचे कागदपत्र तात्काळ सादर करावीत. संबंधित प्रकल्प अधिकारी सदर कोर्स मॅप करण्याकरिता विहित नमुन्यातील माहिती आयुक्तालयाला सादर करतील.कॉलेज मॅपिंगसाठी प्रकल्प अधिकारी यांना आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे : - संस्थातर्गत (Parent body)
- नोंदणी प्रमाणपत्र प्रत
- महाविद्यालय (College)
- विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पत्र.
- सरकार आणि युजीसी मान्यताप्राप्त पत्र.
- अभ्यासक्रम (Course)
- कोर्स आणि विशिष्ट विद्यापीठाचे मान्यताप्राप्त / परवानगी पत्र.
- व्यवसायिक (Professsional) अभ्यासक्रमाबाबत AICTE चे परवानगी पत्र (लागू असेल तर).
- सरकारी मान्यता पत्राची प्रत .
ज्या महाविद्यालयाने प्रकल्प कार्यालयाची मान्यता घेतली आहे तेच महाविद्यालय दिसू शकेल आणि जर विद्यार्थ्याला अर्ज करतांना आपले महाविद्यालय दिसत नसेल तर महाविद्यालयाशी संपर्क साधावा .सदर वर्षी पोस्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत काही बदल करण्यात आले आहे .
- सदर वर्षी पोस्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत काही बदल करण्यात आले आहे, आदिवासी विकास विभागाने सदर वर्षाचा कॉलेज मास्टर डाटा व कोर्स मास्टरची माहिती सर्व विद्यापीठाकडून घेतलेली आहे.
- ज्या कॉलेजांनी आधी नोंदणी केली आहे आणि आतापर्यत etribal प्रणालीमध्ये अनुदान प्राप्त झाले आहे अशा कॉलेजांनी कॉलेज मॅपिंग परत करणे जरुरी आहे.
- सर्व नोंदणीकृत महविद्यालयाने लॉगीन करून आपल्या कॉलेजच्या जुने नावाप्रमाणे व नवीन नाव विद्यापीठ नोंदणीप्रमाणे ड्रोपडाउन यादीमध्ये म्यापिंग करने आवश्यक आहे.
- ज्या महाविद्यालयानी कॉलेज मॅपिंग करून सर्व कागदपत्रे प्रकल्प कार्यालयात पाठविली आहेत अशाच कॉलेजला प्रकल्प कार्यालय मान्यता देतील.
- विद्यार्थी अशाच कॉलेजला अर्ज करतील जे कॉलेज प्रकल्प कार्यालयाकडून मान्य झालेले आहेत.
- फक्त विद्यापीठाने मान्यता प्राप्त केलेले कोर्सेस व महाविद्यालय मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती नियोजनासाठी पात्र ठरतील व त्यानंतरच ते कॉलेज सर्व कोर्सेससाठी फी भरू शकतील.
महाविद्यालयांनी महाविद्यालयाला /कोर्सला मान्यता मिळालेल्यांची यादी खालील लिंकवरती होमपेजवर कॉलेज - कोर्स यादी या Tab वर क्लिक करून पाहू शकता, लिंक खालीलप्रमाणे. https://etribaltest.maharashtra.gov.in/eVikas/Main/Common/Aboutevikas.aspx
जर आपल्या प्रणालीत महाविद्यालय/कोर्सचे नाव (महाविद्यालयाचे लौगीण केल्यानंतर) अस्तीत्वात नसेल तर पुढील प्रक्रिया करा:
- महाविद्यालयांनी महाविद्यालय नोंदणी प्रत, विद्यापीठ संलग्नता प्रत आणि विद्यापीठ परवानगी प्रत प्रकल्प कार्यालयामध्ये जमा करावे (वरीलप्रमाणे).
- प्रकल्प कार्यालय वरील कागदपत्रे पडताळनी करून आयुक्त कार्यालय यांच्याकडे पाठवतील व आयुक्त कार्यालय ती माहिती पडताळणी करतील.
- आयुक्त कार्यालय महाविद्यालय/कोर्स सामावून घेण्यासाठी मान्यता देतील.
- जेव्हा आयुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळेल त्यानंतरच महाविद्यालय/कोर्स प्रणालीमध्ये समाविष्ट केले जातील.
जर आपण आपला युजर आयडी किंवा पासवर्ड विसरला असाल तर आपल्या महाविद्यालय किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधा. पुन्हा नवीन नोंदणी करू नका .
ऑक्ट २०१३ आणि मार्च २०१४ चा एस. एस. सी. डाटा नोंदणी साठी सध्या उपलब्ध आहे.
आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्या साठी एकदाच नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. आपण एकदा नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. आधी नोंदणी केलेला युजर आयडी व पासवर्ड सर्व योजनांसाठी वापरावा. आपण एका पेक्षा जास्त वेळा नोंदणी केल्यामुळे आधार क्रमांका बाबत शंका असल्यास आपल्या विद्यालय किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.
आधार क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याने , सदर तपशील नोंदविणे जरुरी आहे.
अर्ज भरण्याच्या सूचना
|
मराठी
|
15/01/2013
|
0.87 मेगा बाइट
|
|
मराठी
|
15/01/2013
|
0.92 मेगा बाइट
|
|
मराठी
|
15/01/2013
|
0.40 मेगा बाइट
|
-
महाविद्यालया ने संबंधित कोर्से फी अद्यावत करावी आणि संबंधित प्रकल्प कार्यालयाने मंजूर करावी .
सदर प्रक्रिये साठी माहिती पुस्तिका वेब साईट वर उपलब्ध आहे.
-
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला जात पडताळणी दाखला माहिती देणे अनिवार्य आहे.
-
महाविद्यालयाने परिशिष्ठ-ब (Statement-B) संबंधित प्रकल्प कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे.